जलशक्ती अभियानना अंतर्गत केंद्रसरकारच्या पथकाकडुन पाहणी

209

The गडविश्व
गडचिरोली, १६ जुलै : जिल्हयात विविध यत्रणांनी जलशक्ती अभियान अंतर्गत जलसंधारणाची उत्तम कामे केलेली असून त्यांना अधिक गती देण्याची गरज आहे व भूगर्भातील भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे सुचविले. तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन व स्थानिक नागरीकांच्या अनुभवांची त्यांना सांगड घातल्यास जलसंवर्धनाचे काम अधिक जोमाने होईल असे प्रतीपादन केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाचे केंद्रीय अधिकारी कुणाल कुमार
सह सचिव भारत सरकार यांनी केले. गडचिरोली येथे नियोजन भवन येथे आज आयोजीत आढावा सभेत ते बोलत होते. या प्रसंगी संजय मिणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जिल्हयात सुरु असलेल्या जलशक्ती अभियान अंतर्गत कामाबाबत विस्तृत माहिती दिली व भुवैज्ञानक तसेच जीआयएस तज्ञ यांचे कडुन जिल्ह्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना सर्व उपस्थित यंत्रणा प्रमुख यांना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सुचविले की, जलजीवन मिशन अंतर्गत काम करण्यात आलेल्या गावात जेथे पाणी पातळी खोलवर आहे अशा ३० ते ३२ गावात प्राधान्याने जलसंवर्धन व पुनर्भरणाची कामे घेण्यात यावी.
आढावा सभेनंतर केंद्रीय पथकाने गडचिरोली येथील जलशक्ती केंद्रास भेट दिली. तसेच गडचिरोली जिल्हयातील पोर्ला येथील परिसरात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, वैज्ञानिक तथा तांत्रिक अधिकारी जलशक्ती अभियान फणी कुमार, जिल्हा जलसंधारण अधिकारी (मृ.व जसं.) विभाग गडचिरोली पी. एम.
इंगोले, जिल्हा जलसंधारण अधिकारी चौधरी, ल.पा.जि.प.गडचिरोली, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) जि.प. गडचिरोली तुरकर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) जि.प. गडाचरोली माणिक चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सादरीकरण जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली पी. एम. इंगोले यांनी केले, तर आभार उप-
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली फर्नेंद्र कुत्तीरकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here