“ईईएसएल संपर्क” पथदिव्यांच्या तक्रारीसाठी गडचिरोली नगर परिषदेचा मोबाईल एप्लिकेशन

271

The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : गडचिरोली शहरातील नागरिकांस पथदिव्यांच्या तक्रारीसाठी नगर पालिकेत तक्रार द्यायला जावे लागू नये याकरिता “ईईएसएल संपर्क” हे अप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे. गुगल प्लेस्टोअर वरून सदर अप्लिकेशन डाउनलोड करून पथदिवे बंद असल्याची तक्रार घरबसल्या आपल्या स्मार्टफोनचा वापर करून दाखल करता करता येणार आहे.
याकरिता गुगल प्ले स्टोअरवरून अप्लिकेशन डाउनलोड करावे. आपले नाव व मोबाईल क्रमांक रजिस्टर करावे. लॉज कम्प्लेंट या आयकॉनवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी व तक्रार सबमिट करावी. सदर तक्रार २४ ते ४८ तासात दुरुस्ती होईल व तक्रारकर्त्यास सायंकाळी ६ नंतर किंवा दुसऱ्या दिवशी कस्टमर केयरकडून दुरुस्तीबाबत विचारणा करणारे कॉल येईल. त्यानुसार तक्रारकर्त्याचे समाधान न झाल्यास पुन: दुरुस्तीकरिता पथदिवे दुरुस्ती करणाऱ्या कामगारांना मेसेज जाईल. तरी सदर अप्लिकेशन डाउनलोड करून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषदेचे विद्युत अभियंता आनंद खुणे तसेच मुख्याधिकारी विशाल वाघ यांचेकडून करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here