इंधन संकट ; ‘या’ ठिकाणी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

482

– वाढती गर्दी नियंत्रणात आणण्याकरिता जवानांना केले तैनात
The गडविश्व
कोलंबो : श्रीलंकेत इंधन संकट वाढले आहे त्यामुळे पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या. पेट्रोल पंपावर वाढती गर्दी पाहता या ठिकाणी सैन्याच्या जवानांना तैनात करण्यात आल्याचे कळते. आज मंगळवारी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली.
इंधनाची कमी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत अचानक वाढ झाल्याने हजारो नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. वाढती गर्दी नियंत्रनात आणण्यासाठी जवांनाना पाचारण करण्यात आले.
ऊर्जा मंत्री गामिनी लोकुगे यांनी म्हटले की, आम्ही पेट्रोल पंपावर जवानांना तैनात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये. लोकं व्यापार करण्यासाठी कॅनमध्ये इंधन भरुन घेऊन जात आहेत.
‘ईंधनसाठी होत असलेल्या गर्दीमध्ये ४ लोकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती पुढे येत आहे. श्रीलंकेत सध्या परिस्थिती बिकट होत चालली आहे. इंधन, गॅस आणि आवश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत आहे. तर श्रीलंका सरकारने भारताकडू मदत मागितली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here