आसाराम बापूंच्या आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये आढळला मुलीचा मृतदेह

282

The गडविश्व
गोंडा : उत्तर प्रदेशातील गोंडा येथील आसाराम बापूंच्या आश्रमात उभ्या असलेल्या कारमध्ये हा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मृत मुलगी ४ दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाली होती, त्यानंतर तिचा मृतदेह आसाराम बापूंच्या आश्रमात अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या एका कारमधून सापडला. कारमधून दुर्गंधी येत असल्याने आश्रमाच्या कर्मचार्‍यांनी कार उघडली असता, त्यात मृतदेह आढळून आला, त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी आश्रय सील केला असून तपास सुरु केला आहे. मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह कारमध्ये लपवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस आणि फॉरेन्सिंक टीम याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here