आलापल्ली वनविभागा अंतर्गत वृक्षतोडीबाबत कार्यशाळा संपन्न

294

The गडविश्व
गडचिरोली, १८ ऑक्टोबर : आलापल्ली वनविभागा अंतर्गत मंजुर कार्यआयोजने नुसार सन २०२२-२३ मध्ये लापल्ली वनविभागा अंतर्गत मंजुर कार्य आयोजनेप्रमाणे करण्यात येणाऱ्या वृक्षतोडी बाबत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या मागदर्शनात आज १८ ऑक्टोबर ला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणुन आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया, मुख्य मार्गदर्शक एम.पी. मदने सेवा निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वनविकास महामंडळ, प्रमुख अतिथी म्हणुन नितेश शंकर देवगडे उपविभागीय वन अधिकारी आलापल्ली, प्रदिप बुधनवार प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी आलापल्ली होते. सदर कार्यशाळेत आलापल्ली वनविभागातील आलापल्ली, अहेरी, पिरमीली, पेडीगुंडम, मार्कंडा, चामोर्शी, घोट परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक संवर्गाचे ८६ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया यांनी दरवर्षी कुपतोडीद्वारे उत्पादित वनोपजापासुन शासनास करोडो रुपयांचा महसुल प्राप्त होतो. त्यामुळे कुप तोडीचे काम जबाबदारींने पार पाडणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन वनाचे संरक्षण व संवर्धनाचे ईश्वरीय कार्य निष्ठेने पार पाडण्याचे आव्हान उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांना केले.
कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक एम.पी. मदने सेवा निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक यांनी कार्यअयोजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या सी. डब्ल्यू.सी., एस. सी. आय. आय. डब्ल्यु. सी. व बांबु कार्यवृत्त अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांची सविस्तर माहिती सादर करुन उपचार नकाशा तयार करणे, सिमांकन करणे, मार्कींग करणे, वृक्षतोड करणे, वृक्षापासुन नग घडविणे, नगावरती मोजमाप नोंदविणे या सर्व कामांचे दस्ताऐवज नोंदविण्याची कार्यवाही करणे बाबत मार्गदर्शन केले.

आलापल्ली वनविभागा अंतर्गत मंजुर कार्यआयोजने नुसार सन २०२२-२३ मध्ये सी.डब्ल्यु.सी. कार्यवृत्त अंतर्गत ११ कुप, एस. सी. आय. कार्यवृत्त अंतर्गत २७ कुप, आय. डब्ल्यु. सी. कार्यवृत्त अंतर्गत ११ कुप, व बांबु कार्यवृत्त अंतर्गत ८ कुपामध्ये वृक्षतोडीचे काम करण्यात येणार आहे. सदर कुपांपासुन ३५२४९ घनमिटर इमारती माल, ३६८३५ जळाउ बिटे, ५५०००० लांब बांबु व ५५००० बांबु बंडल्स उत्पादित होणार असुन सदर उत्पादित वनोपजापासुन २०० कोटी रुपयापर्यंत अपेक्षित शासन महसुल निर्माण होणार असुन या कामांद्वारे आलापल्ली वनविभागा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरीकांना ६९३३०० मनुष्य दिवस रोजगार निर्मीती करण्यात येणार आहे. तसेच जंगल कामगार सहकारी संस्था मार्फत कामे करण्याकरीता 19 कुपांचा जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आला असुन जंगल कामगार सहकारी संस्थांनी जिल्हा संघाद्वारे १७ कुपांची मागणी केलेली असुन सदर कुपांच्या तोडीमधुन ७९६५ घनमिटर ईमारती माल, १४०१७ जळाउ बिटांचे अपेक्षीत उत्पादन असुन याद्वारे सदर जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सभासदांना मोठया प्रमाणावर रोजगार निर्मीती करण्यात येणार आहे.

कार्यशाळेचे प्रास्ताविक नितेश शंकर देवगडे, उपविभागीय वनअधिकारी आलापल्ली, कार्यक्रमाचे आभार प्रदिप बुधनवार प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी आलापल्ली यांनी मानले. सुत्र संचालन योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वितेकरीता शोभा झोडे लेखापाल, अनिल झाडे क्षेत्र सहाय्यक आलापल्ली, अभिनंदन राठोड लिपीक, जिवन पुसाटे लिपीक, प्रदिप कैदलवारं, दामोदर चिव्हाणे वनरक्षक, सचिन जांभोळे वनरक्षक, सायत्राबाई सोनेले, श्रिनिवास गंजीवार व सुरज बावणे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here