आरमोरी : २० हजारांची लाच स्वीकारतांना मुख्य लिपिक एसीबीच्या जाळ्यात

550

The गडविश्व
गडचिरोली : सावकारी परवाण्याचा प्रस्ताव दाखल करून देण्याच्या कामाकरिता सहायक निबंधक सहकारी संस्था तथा सावकाराचे निबंधक कार्यालय आरमोरी येथील मुख्य लिपिक चंद्रशेखर तुळशीराम येवले (४३) यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाप्रवी पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हे सावकारी परवान्याचा प्रस्ताव दाखल करून्याकरिता सहायक निबंधक सहकारी संस्था तथा सावकाराचे निबंधक कार्यालय आरमोरी येथील लिपिक येवले यांच्याकडे गेले असता लिपिक येवले यांनी सदर काम करून देण्याकरिता ३० हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवी गडचिरोली येथे रीतसर तक्रार दाखल केली असता तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. आज २४ मे रोजी लिपिक येवले यांना आरमोरी येथील सहायक निबंधक सहकारी संस्था तथा सावकाराचे निबंधक कार्यालय येथील कक्षात तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाप्रवी पथकाने रंगेहाथ पकडले. येवले यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये आरमोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here