अवैध दारू व तंबाखूवर अंकुश लावण्यासाठी चर्चा

130

– देसाईगंज येथे तालुका समितीची बैठक संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : देसाईगंज तहसील कार्यालयात दारू व तंबाखूमुक्त जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत मुक्तिपथ तालुका समितीची बैठक तालुका अध्यक्ष तहसीलदार संतोष महाले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी तालुक्यातील अवैध दारूविक्री व तंबाखूवर अंकुश लावण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत पोलिस निरीक्षक महेश मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी अभिषेख कुमरे, नायब तहसीलदार आर.डी.कुमरे, नगरपरिषदेचे अधीक्षक महेश गेडाम, पंसचे संतोष मसराम, केंद्रप्रमुख ए.एस.आमनेर, एनएसएस अधिकारी निलेश हलामी, तालुका संघटनेच्या अध्यक्ष शेवंता अवसरे, संघटनेच्या उपाध्यक्ष निलोफर शेख, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशिका तारकेश्वरी कांबळे, आरकेएसके वनिता अढाऊ, तेजोमय सीएमआरसीचे व्यवस्थापक कुंदा मामीडवार, विलास ढोरे, तालुका संघटक भरती उपाध्ये, तालुका प्रेरक अनुप नंदगिरवार, पोलिस नाईक पंकज मोहुर्ले उपस्थित होते.
यावेळी तंबाखू विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेणे. जे अपंग आणि गोपाळ दारू विक्रेते आहेत त्यांच्यासाठी काय करता येईल, मोहफुलाचा चांगला उपयोग कसा करता येईल, बचत गटाने मोहफूल खरेदी करून त्यापासून तयार केलेले पौष्टिक लाडू शाळेमध्ये देणे, ग्रामपंचायतस्तरीय समिती, मॅरेथॉन स्पर्धा इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. सोबतच विविध गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल यावर चर्चा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here