‘अफवा पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्स बंद करणार’ : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

146

The गडविश्व
नवी दिल्ल्ली : अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि युट्यूबवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिला आहे.
मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “मी खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मला आनंद आहे की जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे. यु ट्यूबने देखील समोर येत अशा यु ट्यूब चॅनल्सला ब्लॉक केले आहे”
गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवण्याचा ठपका ठेवत डिसेंबर २०२१ मध्ये २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. यातून समाजात फूट पाडणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर भविष्यात देखील कारवाई सुरूच राहिल, अशी माहिती मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here