अखेर रूपेश वलके यांच्या मागणीला यश : रेशनकार्डवर मिळणार जळाऊ लाकडे

227

– उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांचे आदेश जारी, नागरिकांना दिलासा
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा जंगलव्याप्त असूनही गोरगरीब नागरीकांना जळाऊ लाकडे उपलब्ध होत नसल्याने नागरिक जंगलाकडे धाव घेत आहे. मात्र जंगलातील हिंस्त्र प्राण्याच्या घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. त्यामुळे वनविभागाने डेपोमधून राशन कार्डवर सर्वसामान्यांना जळाऊ लाकडे उपलब्ध करून दयावी अशी मागणी शहरातील सामाजीक कार्यकर्ते रूपेश वलके यांच्यासह इतरांनी मुख्य वनरक्षकांकडे निवेदनातून मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले असून रेशनकार्डवर जळाऊ लाकडे आदेश उपवनरक्षक मिलीश शर्मा यांनी जारी केले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
वाढती महागाई तसेच सिलेंडरल्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसान्यांचे हाल होत आहे. पुन्हा एकदा नागरिक चुली वरच्या स्वयंपाकलाला पसंती देत आहेत. जिल्हा जंगलव्याप्त असूनही वनविभाग नागरिकांना जळाऊ लाकडे उपलब्ध करून देत नसल्याने नागरिकांमध्य वनविभागाप्रती रोष व्यक्त होत होता. तर जंगलात सरपणासाठी गेले असता हिंस्त्र प्राण्यांची भिती त्यातच हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्याच्या घटना उघडकीस आल्याने नागरिक जंगलात जाण्यास भित होते. यासंदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते रूपेश वलके यांच्यासह इतर नागरिकांनी मुख्य वनसंरक्षकांना निवेदनातून रेशनकार्डवर जळाऊ लाकडे उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. अन्यथा तिव्र आदोलन करण्याचा इशारा सुध्दा देण्यात आला होता. या निवेदनाची दखल घेत उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी 25 जून रोजी परिपत्रक जारी करत अंतिम संस्कारासाठी जळाऊ लाकुड राखीव ठेवून उर्वरीत बिट निस्तार हक्कातंर्गत अल्प भुधारक, शेतकरी, दारीद्रय रेषेखालील व्यक्तींना रेशनकार्डवर निस्तार बिटाचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता नागरिकांना रेशनकार्डवर जळाऊ लाकुड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here