नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; १२ दिवस चालणार विधिमंडळाचे कामकाज

2

नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन; १२ दिवस चालणार विधिमंडळाचे कामकाज
The गडविश्व
मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणार असून शुक्रवार, १८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विधानभवन येथे आयोजित या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ७ ते १८ डिसेंबर २०२६ या कालावधीत नागपूर येथे अधिवेशन घेण्याचा निर्णय निश्चित करण्यात आला. तसेच दोन आठवड्यांच्या विधिमंडळ कामकाजाचे नियोजन आणि अधिवेशनातील कामकाजाच्या रूपरेषेचाही आढावा घेण्यात आला.
या अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींचे केंद्र ठरणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #MaharashtraWinterSession #Nagpur #WinterSession2026 #MaharashtraPolitics #MaharashtraAssembly #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here