गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात बीआरएसपी चे विनोद मडावी सह दोन नामनिर्देशनपत्र दाखल

261

– एकूण 75 नामनिर्देशन अर्जाची उचल
The गडविश्व
गडचिरोली, दि.२३ : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत १२ – गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात २२ मार्च रोजी दोन नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. यात विनोद गुरूदास मडावी (बी.आर.एस.पी.) व हरिदास डोमाजी बारेकर (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच ८ व्यक्तींनी २९ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण ७५ नामनिर्देशन अर्जाची उचल झाली आहे.
लोकशाही विरोधी भारतीय जनता पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी इंडिया आणि महाविकास आघाडीतर्फे कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्याने आणि बहुजन – आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन चालण्याचे धोरण नसल्याने बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज उभा करण्याच्या विचाराने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षातर्फे गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघा करीता विनोद गुरुदास मडावी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
काॅंग्रेस पक्षाने भाजपच्या विरोधात दिलेला उमेदवार प्रभाव नसलेला आणि जिल्ह्याभरातील आदिवासी बहुल भागातील पारंपरिक इलाके व ग्रामसभांनी नाराज निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विनोद मडावी यांच्या उमेदवारीला महत्त्व प्राप्त झाले असून प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीतील अनेक पक्ष बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाला निवडणूकीत प्रत्यक्ष समर्थन देवून प्रचार करण्याची शक्यता असल्याने यावेळी गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत निर्माण होणार आहे.
यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वाळके, पुरुषोत्तम रामटेके, प्रफुल्ल रायपुरे, महिला शहर अध्यक्ष विद्या कांबळे , रेखा कुंभारे, शोभा खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सतिश दुर्गमवार, सरपंच देवीदास मडावी, धनराज दामले, प्रतिभा दामले, प्रकाश मडावी, सुरज मडावी प्रामुख्याने उपस्थित होते.

12- गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघासाठी बुधवार दिनांक 20 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. त्यानंतर पहिले दोन दिवस कोणाकडूनही नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले नव्हते. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता ६ जून पर्यंत लागू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here