
मी विनोद रोहिदास मटंकवार, माझे गाव कोपरली हे गाव मुलचेरा तालुक्यापासून ३ किमी अंतरावर आहे. माझे प्राथमिक शिक्षण गावातच झाले त्यानंतरचे शिक्षण मूलचेरा येथील वीर बाबुराव शेडमाके महाविद्यालय येथे झाले. सन २०११ मध्ये मी १२ वी ला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. माझे आई वडील शेतकरी आहेत त्यामुळे मला स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती नव्हते जेव्हा मला स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? हे कळायला लागले तेव्हापासून मला आर्मी भरतीची क्रेज होती. २०११ साली गडचिरोली येथे झालेल्या पोलीस भरती करिता मी फॉर्म भरला परंतु त्यामध्ये मला अपयश आले. माझी पहिलीच भरती असल्यामुळे त्या अपयशाचे मी फार मनावर घेतले नाही पण मी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊ शकतो हा विश्वास माझ्यामध्ये दृढ झाला त्यानंतर २०१४ व २०१६ या साली सुद्धा मी पोलीस भरती दिली परंतु परत एकदा माझ्या पदरी अपयशच आले त्यामुळे मी मनाने खूप खचून गेलो होतो. मला काही समजत नव्हते मी काय करू, घरची परिस्थिती बरी नसल्याने मी कामाकरिता बाहेर जाण्याचा निर्णय घेतला व लगेच हैदराबादला कामाकरिता निघून गेलो. एका महिन्यानंतर माझ्या मेव्हण्याने मला फोन करून परत बोलावले, माझ्या मेहुण्याची २०११ सालीच गडचिरोली पोलीस दलात निवड झालेली होती त्यामुळे त्यांनी तू अभ्यास कर तुला जे लागेल त्याकरिता मी तुला सहकार्य करेल त्यामुळे माझी आर्थिक अडचण दूर झाली व मी परत पुन्हा तयारीला लागलो. त्यानंतर लगेच सन २०२१ च्या पोलीस भरतीमध्ये पुन्हा अपयशी झालो मग माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की तू अकॅडमी जॉईन कर मग मी लगेच लक्ष्यवेध अकॅडमीचे संचालक राजीव खोबरे सर व मैदानी चाचणीचे प्राध्यापक नंदनवार सर यांच्याशी संपर्क साधला व अकॅडमी जॉईन केली. लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षेच्या प्राध्यापक वृंदामूळे व जिवलग मित्रांच्या सहकार्याने व माझ्या आई वडिलांच्या प्रेरणेने व त्यांच्या आशीर्वादाने मला आज दहा वर्षानंतर सन २०२३ च्या पोलीस शिपाई मध्ये यश प्राप्त झाले. मला आज माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी चे संचालक राजीव खोबरे सर व नंदनवार सर यांचे मनापासून आभार मानतो.

