विद्याभारती विद्यालयातील विद्यार्थिनींची बालविवाह विरुद्ध शपथ

207

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८जुलै : गडचिरोली येथील विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्श संस्था गडचिरोली आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या एक्सेस टू जस्टिस प्रकल्पांतर्गत बालविवाह विरुद्ध शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्श संस्थेचे क्षेत्र अधिकारी वैभव सोनटक्के यांनी शपथ पूर्वी बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार यावर सावध होण्यास मार्गदर्शन करून शिक्षण हे खूप महत्त्वाचे आहे असा संदेश विद्यार्थ्यांना दिले. यावेळी स्पर्श कार्यकर्ते सायली मेश्राम, लीना बाळेकरमकर, शाळेचे पर्यवेक्षक गोपाल मुनघाटे, देशमुख, संजय गद्देवार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here