The गडविश्व
गडचिरोली, २० ऑगस्ट : 2022-23 या शैक्षणिक सत्रामध्ये विदर्भ इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी विविध विषयामध्ये भाग घेऊन इंडियन टॅलेंट ओलंपियाड स्पर्धे मध्ये यश संपादन केलेले आहे.
सदर स्पर्धेमध्ये वेदांत वरटकर यांने अव्वल स्थान प्राप्त केले त्याकरिता त्याला इंटरनॅशनल ओलंपियाड टॅलेंट असोसिएशन मार्फत प्रमाणपत्र धनादेश आणि सुवर्णपदक बहाल करण्यात आले तसेच मधुरा विजय काळे आणि भार्गवी विजय काळे या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत विजयी झालेल्या स्पर्धकांचा सत्कार समारंभ हा शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमांमध्ये शाळेच्या प्राचार्या नेहारिका मंदारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्णपदक विद्यार्थ्यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन परीक्षा विभाग प्रमुख प्रतिभा कावळे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.