दोन वाघ मृतावस्थेत आढळले : वनविभागात खळबळ

1443

– ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील घटना
The गडविश्व
चंद्रपूर, १ डिसेंबर : जिल्हातील जगप्रसिध्द ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघ मृतावस्थेत आढळल्याची घटना उघकीस आली आहे. सदर घटनेने वनविभागत एकच खळबळ उडाली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन अंतर्गत येणाऱ्या शिवनी वनपरिक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळून आला. तर दुसरी घटना मोहर्ली वनपरिक्षेतील आगझरी परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आल्याची माहीत आहे. सदर दोन्ही वाघाचे मृत्यूने वनविभागत एकच खळबळ उडाली आहे.
शिवनी वनपरिक्षेत्रात ३० नोव्हेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास वनविभागच्या कर्मचाऱ्यांना मृतदेह आढळला.  तर दुसरी घटना मोहर्ली वनपरिक्षेत्रात घडली असून आज सकाळच्या सुमारास वाघ मृतावस्थेत आढळून आला. सदर वाघ हा पाच ते सहा महिण्याचा बछडा असावा अशी शक्यात असून त्याचा मोठया वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा असा अंदाज लावण्यात येत आहे.

(Tadoba) (Chandrpur News update) (Tiger Dead) (moharli) (shivani) (Tadoba Forest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here