– चार दिवसांपूर्वीच झाले होते लग्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्हा हा नैसर्गिकतेने नटलेला असुन जिल्हयात अनेक पर्यटने आहेत. जिल्हयात अनेक ठिकाणी उंच पहाडया व धबधबे असुन याची भुरळ जिल्ह्यासोबतच बाहेरील जिल्हयातील पर्यटकांना पडतांना दिसत आहे. मात्र जिल्हयाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामराड तालुक्यातील बिनागुंडा धबधबा मध्ये दोघाचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना ११ जून रोजी घडली. नवनीत राजेंद्र धात्रक (२७) रा. चंद्रपूर व बादल श्यामराव हेमके (२९) रा. आरमोरी असे मृत्यू झालेल्यांची नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत यांचे नुकतेच ७ जून ला लग्न झाले. लग्नानंतर ते बादल हेमके यांच्यासह भामरागड तालुक्यातील बिनागुडा येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान नवनीत हा बिनागुंडा धबधब्यात आंधोळ करत असतांना त्याला खोल पाण्याचा अंदाज आला नसल्याने बुडाला. त्याला वावविण्याच्या प्रयत्नात बादल हे सुध्दा पाण्यात उतरले. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते दोघेही खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती लाहेरी पोलीस मदत केंद्राला मिळाली असता भामरागड येथे दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. सदर घटनने हळहळ व्यक्त करण्यात येत असुन मेंहदी मिटण्यापूर्वीच पतीचा मृत्यू झाल्याने सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच राहिले. यामुळे नवविवाहितेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #bindgunda #iOS 18 #Darshan #Amol Kale Mumbai Cricket Association #
North Korea South Korea balloons #Jnu #Supreme Court #Sports #PM Kisan