– रांगी गावात पसरली शोककळा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ११ : रांगी येथील रहिवासी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष नारायणराव महादेव हेमके (वय ७४) यांनी आज ११ जून रोजी सकाळी ०९ ते ०९.३० वाजताच्या दरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकताच अचानक झटका आला आणि पत्नी पाठोपाठ त्यांचाही मृत्यू झाल्याची घटना रांगी येथे घडली. यामुळे हेमके परिवारासह रांगी गावात शोककळा पसरली आहे.
मागील एक वर्षांपासून नारायनजी हेमके यांची पत्नी ( वय ६५ ) हे आजाराने ग्रस्त होते, त्यांच्यावर उपचार सूरु होता. मात्र अचानक पत्नी मृत्यू पावल्याची घटना कानी पडताच पती नारायनजी हेमके यांनी सुद्धा आपली प्राण ज्योत विझवली.
त्यांच्या पश्चात ४ मुली व एक मुलगा असा बराच मोठा आप्त परिवार आहे. वृद्ध काळातही आपल्या पत्नीवर अतूट प्रेम करणारे नारायनजी हेमके यांनी पत्नीची साथ मरे पर्यंत सोडली नाही. त्यांच्या जाण्याने प्रेम जगात आणि समाज मनात एक वेगळीच ओळख करून दिली आहे.
रांगी परिसरातील नावाजलेले व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वांना सहकार्य करणारे अशी त्यांची ओळख होती. जाताना पत्नी प्रेमाची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांच्या पती पत्नी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

(#thegdv #thegadvishva #dhanora #gadchirolinews )