–कुटुंबाला केली आर्थिक मदत
The गडविश्व
अहेरी, दि.२७ : तालुक्यातील रेगुलवाही येथील दोन घरांना घराला अचानक आग लागल्याची घटना आज २७ एप्रिल रोजी दुपारी एक ते दिड वाजताच्या सुमारास घडली. पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या कवेत गेल्याने संपूर्ण घर जाळून खाक झाले. यात सिद्दु कुळमेथे व राकेश कुळमेथे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विचारपूस करून आर्थिक मदत करत आधार दिला आहे.
सिद्दु कुळमेथे व राकेश कुळमेथे हे लग्न कार्याकरिता बाहेर गावी गेले होते. दरम्यान घरात कोणीही नसतांना अचानक घराला आग लागली. यात घरातील संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळून खाक झाले. सदर घटनेने कुळमेथे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहिती होतास घटनास्थळी धाव घेत घटनेबाबत जाणून घेतले व घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर पंचनामे करून कुळमेथे कुटुंबाला शासनाकडून मदत करण्यात यावी असे सांगितले. दरम्यान कुळमेथे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूसाठी कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.
यावेळी माजी जि. प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #ajaykankadalwar )