The गडविश्व
गडचिरोली, दि.२० : आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित हे २१ व २२ फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
बुधवार 21 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 08.00 वा. शासकीय विश्रामगृह, कुरखेडा जि. गडचिरोली येथे आगमन व स्थानिक कार्यक्रम आटोपून रात्रौ 09.00 गडचिरोलीकडे प्रयाण. रात्रौ 10.20 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव.
गुरुवार 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वा. गडचिरोली येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 01.00 वा. गडचिरोली येथुन अहेरीकडे प्रयाण. दुपारी 04.00 वा. अहेरी येथे आदिवासी लाभार्थी मेळाव्यास उपस्थिती. सायं. 07.00 वा. अहेरी येथुन चंद्रपूरकडे प्रयाण.
