चंद्रपूर : परीक्षेच्या पूर्वसंध्येला बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत संपविले जीवन

1454

– नोटबुकच्या शेवटच्या पानावर लिहिले ‘स्वारी’
The गडविश्व
चंद्रपूर, दि. २० : उद्या २१ फेब्रुवारी पासून इयत्ता बारावीच्या परीक्षेस प्रारंभ होत आहे अशातच परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीने आपल्या आजोबाच्या घरी पंख्याला गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे. सदर घटना मंगळवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुमित्रानगर तुकुम येथे घडली. अनिशा खरतड (वय १९) असे गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सदर घटनेने एकंच खळबळ उडाली आहे.
अनिशाचे वडील चंद्रपूर पोलिस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे कळते. आई वडील, बहीण भावासह जय दुर्गा अपार्टमेंट मध्ये राहत हिते तर लगतच तिचे आजी आजोबा राहत होते अशी माहिती असून आजी आजोबा नागपूरला गेले असल्याने त्यांचा फ्लॅट रिकामा आहे. उद्यापासून बारावीचे पेपर सुरू होत असल्याने अनिशा अभ्यास करायला त्यांच्या फ्लॅटमध्ये जायची. तर अनिशा मागील वर्षीच बारावीची परीक्षा पास झाली होती मात्र गणितात जास्त गुण मिळावे म्हणून पुनर्परीक्षा देणार होती. दररोजप्रमाणे आज ती अभ्यास करायला आजोबांच्या फ्लॅटमध्ये गेली होती. मात्र बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नाहीत्यामुळे तिचे आई-वडील त्याठिकाणी गेले. त्यांना दरवाजा उघडाच आला. त्यांनी रुममध्ये जाऊन बघितले असता अनिशा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.अनिशाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघून आई-वडिलांनी मोठा हंबरडा फोडला.
घटनेची माहिती दुर्गापूर पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी करताना नोटबुकच्या शेवटच्या पानावर ‘स्वारी’ लिहिल्याचे दिसून आले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून परीक्षेच्या पूर्वसंध्येला अनिशाचे असे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

( #thegdv #thegadvishva #chandrpuenews #12thexam #hscexam )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here