गडचिरोलीतील जेवण, लोकं छान.. जाम भारी वाटलं ; इथं येण्यास लोक घाबरतात आम्ही पुन्हा येवू

1295

– महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरुण कदम यांचे प्रतिपादन
The गडविश्व
गडचिरोली, दि.२० : ‘गडचिरोली म्हणजे इकडे सावजी, चिकन मटन म्हणजे डोक्यातून असा घाम आला पाहिजे अशी गंमत, आम्हाला जाम भारी वाटलं, इथले जेवण छान आहेत, माणस छान आहेत असेच प्रेक्षक मिळाले तर आम्हाला सुध्दा छान वाटेल, त्यामुळे आमची ऊर्जा वाढते. गडचिरोलीत लोक यायला घाबरतात पण आपण पुन्हा पुन्हा येवू तुम्हाला हसवायला’ असे प्रतिपादन महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अरुण कदम यांनी ‘The गडविश्व’ ला दिलेल्या खास मुलाखतीत केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) पटांगणात सुरू असलेल्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी १९ फेब्रुवारीला मतदार जनजागृतीवरील पथनाट्य व हास्यजत्रा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी हास्यजत्राच्या चमूने धमाल विनोद रंगवित सर्वांना पोट धरून हसायला लावले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या चमूचे प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, अरुण कदम,प्रभाकर मोरे, ओमकार राऊत, श्याम सुन्दर राजपूत, शिवाली परब, वनिता खरात, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, प्रियदर्शिनी इंदलकर यांनी सादर केलेले विनोदी किस्से, नात्यावर आधारित गमंतीजमतीने कार्यक्रमात रंगत आली.

 

तसेच त्यापूर्वी फुले-आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीवर पथनाट्य सादर केले. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदानाचे महत्व सादर करून. त्यानंतर निवडणूकीत लोकशाही परंपरेचे जतन करून शांततापुर्ण मार्गाने व निवडणूकीचे पावित्र्य राखून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. सुरूवातीला आमदार देवराव होळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आज २० फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाच्या समारोपीय दिवशी कुवारा भिवसेन यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महासंस्कृती महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #arunkadam
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा #MaharashtrachiHasyaJatra #सोनीमराठी )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here