कोंढाळा पीएम श्री शाळेत वृक्षारोपण; नव्या शेडचे लोकार्पण उत्साहात

56

कोंढाळा पीएम श्री शाळेत वृक्षारोपण; नव्या शेडचे लोकार्पण उत्साहात
The गडविश्व
ता. प्र/देसाईगंज, दि. २६ : पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोंढाळा येथे विविध विकासकामांच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या नव्या शाळा शेडचे लोकार्पणही करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. नव्याने उभारण्यात आलेल्या शेडमुळे उन्हाळा व पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत आमदार रामदास मसराम यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, धनपाल मिसार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हरिभाऊ पत्रे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष कैलास राणे, सरपंच अपर्णा राऊत, युवक काँग्रेसचे अमर भर्रे, आक्रोश शेंडे, मुख्याध्यापक योगेश्वर ढोरे यांच्यासह सीताराम धोटे, हितू तुपट, विनोद राऊत, सचिन झीलपे, अरुण कुंभलवार, अनिता शेंडे, शिशुपाल वालदे, भाऊराव गायकवाड, अथर्व राणे, निलेश दुपारे, विकास मोहुर्ले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे शाळेच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here