‘त्या’ रुग्णांना एसटी महामंडळाच्या साधारण बसमध्ये मिळणार मोफत प्रवास

1042

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २० जुलै : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाहतूक खाते विभागाने परिपत्रक काढून महाराष्ट्रातील सिकलसेल, एच. आय. व्ही. बाधित, डायलिसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने विनामूल्य प्रवास सवलत देण्याबाबतचे परिपत्रक १७ जुलै रोजी काढले आहे. यामुळे आता या रुग्णांना मोफत प्रवास करता येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या साधारण बसने सिकलसेल, एच. आय. व्ही. बाधित, डायलिसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना साधारण बस मध्ये मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या रुग्णांना आधार मिळाला आहे. बाधित रुग्णांना महाराष्ट्रात विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन मुंबई येथुन काढले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, ‘Those’ patients will get free travel in ordinary buses of ST Corporation)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here