‘तुझ्या एका मताने मी निवडून येतो का… ; गडचिरोलीतील आमदाराने मतदाराला सुनावले, ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल

2502

– या पूर्वी एका पत्रकारालाही खालच्या दर्जाची शिवीगाळ
The गडविश्व
गडचिरोली, २० जुलै : नुकताच तलाठी आणि वनविभागाची भरती रद्द करा अशी मागणी गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी विधानसभेत केली असता एका मतदाराने आमदार डॉ. देवराव होळी यांना तुम्ही आदिवासींसाठी आरक्षित मतदार संघातून निवडून येता, मग आदिवासींची बाजू का घेत नाही असा प्रश्न केला असता ‘तुझ्या एका मताने मी निवडून येतो का’ असे आमदाराने सुनावले. याबाबतची दोघांमधील संवादाची ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली असून आदिवासी युवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच यापूर्वी एका पत्रकारही खालच्या खालच्या दर्जाची शिवीगाळ केली होती त्याबाबत सुद्धा ‘ऑडिओ क्लिप’ यापूर्वीच व्हायरल झाली असून ती सुद्धा हाती लागली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तलाठी आणि वनरक्षक भरतीमध्ये पेसा अंतर्गत सर्वाधिक जागा आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ‘ओबीसी’ समाजामध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली असून या भरतीत ओबीसींना बरोबरीने स्थान देण्यात यावे याकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच नुकताच पावसाळी अधिवेशनात विधानसभेत आमदार होळी यांनी त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करून ही पदभरती रद्द करा अशी मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने एका मतदाराने आमदार होळी यांना ‘तुम्ही आदिवासींसाठी आरक्षित मतदार संघातून निवडून येता, मग आदिवासींची बाजू का घेत नाही, पदभरतीत इतर समाजाच्या जागा वाढवून देण्याची मागणी करण्याऐवजी भरतीच रद्द करा अशाप्रकरची मागणी का केली असा प्रश्न विचारला असता त्या मतदाराला ‘तुझ्या एका मताने मी निवडून येतो का’ एवढा का लार्ड गव्हर्नर झाला का’ अशा शब्दात सुनावले. सदर दोघाच्या संवादाची ‘ऑडिओ क्लिप’ व्हायरल झाली असून आदिवासी युवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, gadchiroli MLA Dr. Holi, ‘Do I get elected by your one vote… ; MLA from Gadchiroli told the voter, ‘audio clip’ viral, Reliance share price, MLS All-Stars vs Arsenal, Chelsea vs Wrexham, DCECE Result 2023, Teesta Setalvad, Is WhatsApp Down)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here