– घाबरून जाण्याचे कारण नाही
The गडविश्व
गडचिरोली, २० जुलै : आज २० जुलै रोजी सकाळच्या दहा ते साडेदहाच्या सुमारास देशभरातील अनेकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला. यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचे सांगण्यात आले. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला. यामुळे अनेक नागरिक घाबरूनही गेले होते असे कळते.
अशाप्रकारच्या आपतकालीन संदेश सेवेच्या चाचणीचा अलर्ट देण्यात येणार आहे याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती त्यामुळे या अलर्टबाबत नागरिक अनेक तर्क वितर्क लावत आहेत. मात्र या संदेशाने घाबरण्याची आवश्यकता नाही ते केवळ एक चाचणी होती. या अलर्टनंतरही केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

(the gdv, the gadvishva, india gov, An alarm suddenly rang on your mobile; What is the reason behind it?)