‘या’ गावात घरगुती दारू काढण्यावरही आहे बंदी

118

– दुर्गम भागातील आदिवासी ग्रामस्थांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, ३ फेब्रुवारी : एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या भापडा गावाने सर्वानुमते निर्णय घेऊन मागील दोन वर्षांपासून घरगुती दारू गाळणे व विक्री करण्यावर बंदी घातली आहे. आता जवळपास दोन वर्षांपासून या गावात दारूविक्री केली जात नाही. हे गावातील मुक्तिपथ गाव संघटन सदस्य व ग्राम पंचायत समितीचे यश आहे.
एटापली तालुक्यातील सोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत भापडा हे गाव तालुक्यापासून ६६ किमी अंतरावर वसलेले आहे. गावातील नागरिकांचा व्यवसाय मुख्यत: शेती व पुरक व्यवसाय म्हणून शेळी पालन, कोंबडी पालन, गाय पालन, मच्छी पालन केले जाते. त्यात कित्येक वर्षापासून चालत आलेल्या परंपरेनुसार गावात लग्न, पोलवा, पांडुम इत्यादी आदिवासी सणाला घरीच असलेल्या मोहफुलाची दारू काढून वापर करणे ही परंपरा कित्येक वर्षापासून चालत आलेली आहे. मुक्तिपथ अभियानद्वारे गावात मुक्तिपथ गाव संघटन स्थापन करण्यात आली व अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी बैठकी होऊ लागल्या.
गावात ग्रामसभा व पोलो अशा बैठकीमध्ये गावातील तरुण दारू पिऊन गोंधळ घालायचे व तरुण मुलांनी दारू प्यायला सुरुवात केली होती. दरम्यान, गावात मुक्तिपथ गाव संघटन अध्यक्ष गाव पाटील यांनी बैठक लावली. गावात बैठकीमध्ये मुक्तिपथ गाव संघटन सदस्य, गाव पाटील, भुमय्या, बचतगट महिला, युवा संघटन सदस्य सर्वजण सहभागी झाले. गावात दारूविक्री, पिणे यावर चर्चा सुरू झाली. गावातील युवक व काही नागरिक म्हणाले की, ‘दारू आमची परंपरा आहे. आम्हाला पूजेला दारू लागतो. आम्ही दारू पिणारच व काढणारच’ असा सुर आला. गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी आपले मार्गदर्शनात बोलताना सांगितले की, आपण दारू दारू करत कुठपर्यंत जगणार. या दारू पिण्यामुळे गावातील तरुण नौकरी भरतीत अपयशी होतात. गावात झगडे, मारपीट होत असल्याने गावाची बदनामी होते. आपल्या गावातील तरुणाना ल्ग्नाकरिता मुली देताना विचार करतील असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुढे गाव पाटील यांनी गावात घरघुती दारू काढायची की नाही ? यावर चर्चा करायला लावली असता सर्वानुमते गावात दारू काढणे बंद करावे. गावात सन उत्सव, पोलो, पांडुम, नवाचे पोलो असतील तरीसुद्धा गावात घरघुती दारू काढायची नाही. गावात घरघुती दारू काढताना आढळला तर 10 हजार रुपये दंड घेतला जाईल असा निर्णय घेण्यात आला. आता भापडा गावात 2 वर्षापासून घरघुती दारू काढणे व विकणे पुर्णपणे बंद आहे. गावातील गाव संघटन सदस्य व ग्राम पंचायत समितीचे यश आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (CA Foundation Result) (Juventus vs Lazio) (Viswanath) (Michael movie Review) (JEE Mains Answer Key 2023) (The Last of Us)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here