महिलेने बिबट्याचे कान पकडून डोक्यावर मारला चपटा ; सत्य समोर आल्यानंतर धक्काच बसला

1873

– रात्रीच्या अंधारात शेड मध्ये बकरी समजून बिबट्याला दिला चपटा
The गडविश्व
छत्रपती संभाजीनगर, २५ जून : मानव वन्यजीव संघर्ष वाढत चाललेला दिसत असतांना विविध घटनेत काहींनी प्राण गमावले तर काही थोडक्यात बचावले. अशीच घटना जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात घडल्याचे पुढे येत आहे. झाले असे की शेड मध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर महिलेने थेट बिबट्याशी झुंज दिली व यात ती थोडक्यात बचावली तर एका बकरीचा मृत्यू झाला.
गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात मधुकर लांडे यांच्या शेतवस्तीवर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बकरी बांधण्याच्या शेडमध्ये बिबट्या शिरला. यावेळी बकऱ्यांनी बिबट्याला पाहाताच आरडाओरड सुरू केली. दरम्यान बकऱ्यांचा आवाज बाजूलाच राहत असलेल्या महिलेला ऐकू गेला असता बकऱ्याचे भांडण सुरू असल्याचे समजून ति अंधारातच शेडमध्ये गेली आणि बिबट्याला ढकलण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर त्याचा कान धरून डोक्यावरही चापटा मारल्या. दोन ते तीन मिनिटं असेच सुरू होते. यावेळी बिबट्या शिकारीमध्ये असल्यामुळे बिबट्याने महिलेकडे दुर्लक्ष केले. शिकार झाल्यानंतर महिलेला जेव्हा बिबट्या असल्याचे लक्षात आले तेव्हा तिने आरडाओरड केली व महिलेचा आवाज ऐकून बिबट्याही पळाला. तोपर्यंत बिबट्याने एका बकरीची शिकार केली होती. आपण ज्याचे कान पकडले आणि डोक्यावर चपटा मारला तो बिबट्या होता हे समजताच महिलेचा चांगलाच थरकाप ऊडाला. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे महिलेचे देखील कौतुक होत आहे. घटनेची माहिती होताच वन विभाग अधिकारी आणि पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here