The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २५ जून : नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल घोषित झाले आणि यात काही विद्यार्थी नापास झालेत. परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व समुपदेशन तालुकास्तरीय कार्यशाळा जे.एस.पी.एम. महाविद्यालय धानोरा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून साखरे डायट जिल्हा शिक्षण प्रशिक्षण गडचिरोली, दुगा मॅडम, राऊत सर, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजू किरमिरे, प्राध्यापक डॉ. हरीश लांजेवार मंचावर उपस्थित होते. जे विद्यार्थी वर्ग दहावी व बारावीत अनुत्तीर्ण म्हणजे नापास झाले त्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा व समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यामागची पार्श्वभूमी प्राध्यापक खोब्रागडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून मांडली. नापास झाले की विद्यार्थी आत्महत्या करताना दिसतात, नापास झाले म्हणजे सर्व शिक्षण संपले असे होत नाही तर पुढील वाटा त्याला आयुष्यातून शोधून काढणे आणि त्याला न्याय देणे हे त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणाबद्दल दिसून येते. विद्यार्थी वर्ग दहावी बारावी नापास झाला असला तरी त्यांच्यामध्ये इतर गुण असतात की ते गुण विद्यार्थ्यांनी शोधून आपली प्रगती करावी. हे करत असताना त्यांनी आपले मन विचलित न होता आत्महत्या सारख्या शेवटच्या टोकाचा पर्याय न निवडता आवड क्षमता व संधी शोधून आपला मार्ग काढावा. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून साखरे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण कार्यालय गडचिरोली यांनी दहावी बारावी नापास विद्यार्थ्यांना समुद्रेशन करताना आज विद्यार्थ्यांना गरज का पडली विद्यार्थी अशी टोकाची भूमिका का निवडतात या प्रश्नाची उकल करण्यासाठी आणि त्यांच्या अंगी असलेले गुण हेरून त्यांना त्या विषयांमध्ये प्राविण्य मिळवून पुढील आयुष्य सुखकर करता येईल असे त्यांनी आपल्या समुपदेशातच सांगितले. यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच कर्मचारी व तालुक्यातील दहावी बारावीला नापास विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक आवारी यांनी केले तर आभार प्राध्यापक करमनकर सर यांनी मानले.
(the gdv, the gadvishva,