पोदार जंबो किड्स च्या शिक्षकांनी घेतले आधुनिक शिक्षणाचे धडे

262

The गडविश्व
गडचिरोली, ३ मे : पोदार शिक्षण समूह अंतर्गत नागपूर येथे २८ व २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये गडचिरोली येथील पोदार जंबो किड्स च्या शिक्षिकांनी उपस्थित राहून नवीन अध्यापन तंत्र आत्मसात केले.
सदर प्रशिक्षणासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नेहारिका मंदारे, पूर्व प्राथमिक विभागाच्या समंवयिका समरिन धमानी तसेच ऋतिका मामिडवार, प्रतिभा कावळे, मेघा रोडे, मेघा कोडापे, सुजाता उंदिरेवाडे, स्नेहल मेश्राम, राजश्री सूर्यवंशी, पल्लवी रायपुरे, हिमांशी उपाध्याय उपस्थित होत्या.
सदर प्रशिक्षणासाठी मुंबईहून आलेल्या पोदार ग्रुप च्या समूहाच्या मुख्य व्यवस्थापिका नैना त्रिवेदी मॅडम यांनी मार्गदर्शन केले. त्रिवेदी मॅडम यांना ५० वर्ष शिक्षण क्षेत्रात कामगिरीचा अनुभव आहे तसेच सोबतीला पोदार ग्रुप च्या सुलभक डिंपल जोशी मॅडम यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले. जोशी मॅडम यांना १५ वर्षाचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव आहे. प्रशिक्षणामधे पोदार जंबो किड्स च्या अभ्यासक्रमाचे महत्त्व पटवून दिले. दिवसेंदिवस अभ्यासक्रमात होणारे नवनवीन बदल करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याची माहिती दिली. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक कसे बनतील याकडे शिक्षकांनी कसे लक्ष द्यावे याबद्दल मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रात येणार्‍या नवनवीन आव्हानांना पार पाडत विद्यार्थी केंद्रित शिक्षण किती महत्वाचे आहे , शिक्षकांना अध्ययन अध्यापन पद्धतीत बदल करून कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करायला हवे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात पोदार इंटरनॅशनल शाळेसारख्या उच्च दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून ६ वर्ष निरंतर सेवा देत असल्याबद्दल पोदार शिक्षण समूहाकडून गडचिरोली येथील पोदार जंबो किड्स चे संचालक ऍड. प्रफुल्ल धाईत आणि मुख्याध्यापिका नेहारिक मंदारे यांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले तसेच उपस्थित शिक्षकांना त्यांच्या उपस्थिती बद्दल गौरवण्यात आले.

(the gdv) (the gadvishva) (vidarbh podar school)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here