दहावीच्या परीक्षेत आश्रम शाळा जारावंडीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

296

– अपेक्षा गुरनुले शाळेतुन प्रथम
The गडविश्व
गडचिरोली, ३ जून : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा जारावंडी चा निकाल ८८.२३ टक्के लागला आहे. अनेक वर्षाची उत्कृष्ट निकालाची पंरपरा सांभाळत दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत शाळेसाठी अभिमानास्पद कामगीरी केली आहे.
अपेक्षा प्रकाश गुरनुले हिने ८७.२० टक्के गुण प्राप्त करीत शाळेतुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर व्दितीय क्रमांक सुमित सुधाकर टेकाम ८५. ८० टक्के तर तृतीय क्रमांक वैष्णवी चिंतामण ठाकरे ८५. २० टक्के गुण प्राप्त केले आहे. शाळेतील १२ विद्यार्थी प्राविण्य श्रेतीत उत्तीर्ण झाले आहेत. बारावीपर्यंत शिक्षण देत असलेल्या आणि अनेक पुरस्कार प्राप्त गुणवत्तापुर्ण शिक्षण देणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखविली आहे. विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञान, नाविण्यपुर्ण शिवविण्याच्या पध्दती, वैयक्तीक लक्ष, सातत्यपुर्ण मुल्यांकन पध्दती आत्मसात करीत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.
इयत्ता दहावीला अध्यापन करणारे शिक्षक ए.एम. बारसागडे, एस.एन.गेडाम, एम.के.गेडाम, कु. बी.एन.काटेंगे आणि सहकाऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या परस्पर सहकार्यामुळे तसेच भविष्यवेधी शिक्षण प्रणालीच्या नियोजनबध्द अंमलबजावणीमुळे हे यश मिळाले आहे अशा शब्दात शाळेचे मुख्याध्यापक बी.एम.पंधरे यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले. सर्वच स्तरातुन विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत असून ८७. २० टक्के प्राप्त करून शाळेतून प्रथम आलेल्या अपेक्षा प्रकाश गुरनुले हिने पुढील शिक्षण घेत आयएसएस बनायचे आहे असे बोलून दाखवले. तिने आपल्या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक यांना दिले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli jaravandi, ssc result 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here