– दोन जवान शहीद तर दोन जखमी
The गडविश्व
बिजापूर, दि. ०९ : छत्तीसगड – महाराष्ट्र सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत १२ नक्षली ठार झाल्याची माहिती दुपार पर्यंत प्राप्त झाली होती तर ठार झालेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. दरम्यान आता मिळालेल्या माहितीनुसार ठार झालेल्या नक्षल्यांचा आकडा ३१ वर पोहचला आहे. या चकमकीत २ जवान शहीद तर २ जखमी झाल्याची माहिती असून जखमी जवानांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बिजपुरच्या नॅशनल पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात नक्षली असल्याची माहिती पोलीस दलास मिळाली असता बिजापूरच्या डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटरच्या जवानांनी जंगल परिसरात अभियान राबविले. दरम्यान आज सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. चकमकीनंतर घटनस्थळी शोधमोहीम राबविली चकमकीत तब्बल ३१ नक्षली ठार झाल्याचे निष्पन्न झाले. घटनस्थळावरून मोठ्याप्रमाणात शस्त्रे, स्फोटके व इतर साहित्यही जप्त करण्यात आल्याचे कळते. या चकमकीने नक्षल्यांचे मोठे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.

https://x.com/ANI/status/1888498957053276513?s=19
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #bijapur #cgnews #encounter #naxal #naxalencounter #cgpolice #bastarfighter # drgpolice #crpf #gadchirolipolice )