-गुरनोली गाव संघटनेची कृती
The गडविश्व
गडचिरोली, दि.२० : कुरखेडा तालुक्यातील गुरनोली या गावात अवैध दारूविक्री बंद होती. परंतु, निवडणूक लक्षात घेता, काही विक्रेत्यांनी अवैध दारूविक्रीसाठी हातभट्टी लावली होती. याबाबतची माहिती मिळताच गाव संघटना, मुक्तिपथ व पोलिसांनी कृती करीत 100 लिटर पेक्षा अधिक मोहफुलाच्या दारूसह साहित्य नष्ट केले. याप्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरनोली येथे अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित करून विक्रेत्यांविरोधात कृती करण्यात आली होती. तेव्हापासून गावातून अवैध दारूविक्री हद्दपार झाली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या काळात काही विक्रेत्यांनी शेतशिवाराचा आधार घेत अवैध दारू गाळण्यासाठी हातभट्टी लावली होती. याबाबतची माहिती मिळताच मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिलांनी शेतशिवारात शोधमोहीम राबवित दारू अड्डे उध्वस्त केले. सोबतच घटनास्थळावर 100 लिटर पेक्षा जास्त मोहफुलाची दारू व साहित्य आढळून आले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील गंगाधर सयाम, मीना नैताम, सायत्रीबाई हलामी, रुंदा पुणे, मनीषा किरंगे, सविता नरोटी, अल्का किरंगे, कल्पना कोरे, शिल्पा वट्टी, निर्मला धुर्वे यांसह इतर गाव संघटनेच्या महिला, ग्रामस्थ व मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #muktipath )