The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ०२ : जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा चा दहावी च्या परीक्षेचा निकाल 98.64%.लागला आहे. या शाळेतून सत्र 2023-2024 मध्ये एकूण 74 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 73 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रावीण्य श्रेणीत 42 प्रथम श्रेणीत 30 द्वितीय श्रेणीत 1 उत्तीर्ण झाले.
यामधे शाळेतून प्रथम क्रमांक अमित दलसू गावळे ( 88.20%), व्दितीय क्रमांक कु. प्रचिती ताराचंद भानारकर (86.40% ), तृतीय क्रमांक आर्यन बळवंत कोतकोंडावार( 86% ), कु. अवंतिका बाबुराव उसेंडी (85.60 %), प्रज्वल विनोद गावळे(85.60%), आशिक राजेंद्र गुरनुले (85.40%), कु. चंदना सुनील निकोडे (84.80%), कु. स्वीटी संतोष एक्का (84.50%), कु.निशा बारीकराव हलामी (84.40%), कु.उज्वला विश्वनाथ ताराम (84.20%), विशाल प्रलय मालाकर (84.20%), जतन बंकिमचंद्र बिस्वास (83.60%), साहिल दिवाकर कोकोडे (83.40%), बादल दुर्योधन गुरनुले(82.60%) गुण प्राप्त केले आहेत. दिव्यांग विद्यार्थी कु. माही संजय मशाखेत्री हिने (68.40%),अतुल अरुण मडावी (65.80%) गुण घेत यश संपादन केले आहे. परीक्षेत मिळालेल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, सर्व शिक्षकांना दिले आहेत.
उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी एस.वाय.आखाडे, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम. सुरजूसे, शाळा व्य.समिती.अध्यक्ष प्रभाकर खोबरे, पी. व्ही.साळवे,एस.एम.रत्नागिरी, डॉ.रश्मी डोके, कु. रजनी मडावी, ए.बी. कोल्हटकर, व्ही.एम. बुरमवार, एम.एल.देवकाते, सौ.आर. ए. कोरेवार , कांचन दशमुखे मॅडम, प्रियंका आनंदवार मॅडम, हरीश पठाण, किरण दरडे मॅडम, ओम देशमुख, सहारे, चेलमेलवार मॅडम, जुनघरे मॅडम, बादल वरघंटीवार,भालचंद्र कोटगले, कोरेटीजी आदींनी अभिनंदन केले आहे.