गडचिरोली : अंगणात झोपून असलेल्या इसमाला पेट्रोल टाकून पेटविले

2533

– थरारक घटनेने परिसरात दहशत
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : नेहमीप्रमाणे घरासमोरील अंगणात खाट टाकून झोपून असलेल्या इसमावर अज्ञाताने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक तेवढीच खळबळजनक घटना जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे २ जून रोजी उघडकीस आली. चरणदास गजानन चांदेकर ( वय४८) असे जळालेल्या इसमाचे नाव असून त्याच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात येथे उपचार सुरु आहे.
वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. याची झळ जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागातही पडतांना दिसत असून ग्रामीण भागात रात्रोच्या सुमारास आपल्या अंगणात नागरिक झोपता असतात. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील चरणदास चांदेकर हे सुद्धा घरासमोरील अंगणात खाटेवर झोपलेले होते. दरम्यान गाढ झोपेमधे असतांना मध्यरात्री त्यांच्यावर अज्ञाताने पेट्रोल टाकून पेटवून दिले व पळ काढला. यावेळी त्यांच्या बाजूला झोपून असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना लक्षात येताच आग विझविली मात्र तोपर्यंत चरणदास हे आगीत गंभीर जखमी झाले. लागलीच चंद्रपूर येथे त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे कळते.या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे. घटनेतील आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान मात्र पोलिसांपुढे उभे आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #aheri)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here