सुरजागड लोहखनिज वाहतूक नागरिकांच्या जिव्हारी : ट्रकने चिमुरडीस चिरडले

819

– आणखी किती जणांचा बळी जाणार ?
The गडविश्व
गडचिरोली, १४ मे : जिल्ह्यात सुरू असलेल्या सुरजागड लोहखनिज वाहतूक नागरिकांच्या जिव्हारी उठले असून रविवार १४ मे रोजी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे चिमुरडीस लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे आणखी किती जणांचा बळी लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक घेणार ? असा आर्त प्रश्न नागरिक करीत आहे. सोनाक्षी मसराम (१२) रा. नांदगाव फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर असे मृतक मुलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, बल्लारशाकडे लोहखनिज घेऊन जाणाऱ्या एमएच ३४ एझेड ९५७५ क्रमांकाच्या ट्रकच्या खाली चिमुकली चिरडल्या गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर ट्रक चालक हा घटनस्थळावरून पसार झाला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. तर घटनेची माहिती होताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शववि्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, chamorshi ashti surjagadh truck accident small girl deth)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here