चामोर्शी : चिचडोह बॅरेज मध्ये चार युवकांचा बुडून मृत्यू

9366

The गडविश्व
ता.प्र / चामोर्शी, १४ मे : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज मध्ये बुडून चार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवार १४ मे रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती पुढे येत आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेज वर काही मित्रमंडळी रविवार १४ मे रोजी पार्टी करण्याकरिता गेले असल्याचे कळते. दरम्यान त्यातील काहींना चिचडोह बॅरेज लगत असलेल्या नदीपत्रातील पाण्यात पोहण्याचा व आंघोळ करण्याचा मोह न आवरल्याने त्यांनी पाण्यात प्रवेश केला. पाण्याची खोली न कळल्याने चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोलू शर्मा (३०) गडचिरोली, महेश भोंगळे (२४) चामोर्शी, प्रफुल्ल येलुरे (२५), चामोर्शी, शुभम लांजेवार (२६) चामोर्शी असे मृतकांची नावे आहेत.  सदर घटनेची माहिती पोलीस ठाण्यात कळविण्यात आली असून या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. वृत्त लिहेस्तव सायंकाळपर्यंत मृतकांची नावे कळू शकली नव्हती मात्र रात्रो उशीरापर्यंत नावे कळली. सदर घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ©© (©मेहनत करा थोडीफार, बातमी कॉपी पेस्ट करू नये, कॉपी पेस्ट केल्यास आम्हाला मेल येतो©)
(the gdv, the gadvishva, gadchiroli dhanora tofa lekha) (Dhanora: Tofa from Lekha hanged himself, chichdoha barage chamorshi)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here