विद्यार्थ्यांनी सादर केले व्यसनविरोधी पथनाट्य

208

– केंद्रस्तरीय उपक्रमात सहा शाळांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, २३ जानेवारी : कोरची केंद्राची केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा विचार कार्यक्रम कार्यशाळा नुकतीच पार पडली. यामध्ये सहभागी सहा शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम यावर पथनाट्य सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नपं चे प्रशासकीय अधिकारी बाबासो हाके यांनी केले. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख हिराजी रामटेके होते. अश्विनी उईके, मुख्याद्यापक अरविंद डी टेम्भुरकर, मुख्याद्यापक आर.के.चिमनकर, के.जी.भोंगे, दिक्षा टेंभुर्णे, एच.एम.तितरमारे, एच.जी.जाळा, काटेंगे, एम.एस.अंबादे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
या उपक्रमात जिप शाळा कोरची, बोदालदंड, जांभळी, सोहले, भिमपुर, एकलव्य आश्रमशाळा या सहा शाळेतील २३ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यावेळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी व्यसनाचे प्रकार, दुष्परिणाम आदींचे ग्रुप सादरीकरण केले. सोबतच पथनाट्य सादर करून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेतून व्यसनाबाबतची माहिती जाणून घेतली. या उपक्रमात कोरची केंद्र शाळेने प्रथम तर द्वितीय क्रमांक भीमपूर शाळेने पटकाविला. या दोन्ही शाळांची निवड तालुकास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली. परीक्षक म्हणून प्रशासकीय अधिकारी बाबासो हाके, अश्विनी उईके यांनी कार्य केले. प्रस्तावना निळा किन्नाके, संचालन के.पी साखरे यांनी केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Netaji birthday 2023) (HUR vs SIX) (Norovirus) (KL Rahul Wedding) (IND vs NZ 3rd ODI)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here