The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २३ : तालुक्यातील रांगी पि.एम.श्री.शाळेतिल शालेय विद्यार्थी मागील पाच ते सहा महिन्यांपासून शालेय मोफत गणवेशा पासुन वंचित ठेवल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होताना दिसते. सत्र संपल्यानंतर शालेय गणवेश कोणत्या कामाचा असा संताप जनक प्रश्न विद्यार्थ्यांचे पालक विचारीत आहेत.
धानोरा तालुक्यात पश्चिम दिशेला असलेले अतिदुर्गम भागातील रांगी गाव असुन येथिल शाळेत विद्यार्थी पटसंख्या संख्या बऱ्यापैकी म्हणजे 180 येवढी आहे. रांगी परिसरातील गावातील मुलेमुली येथे शिक्षण घेतात पण सन २०२४-२५ या चालू सत्रातिल अर्धं सत्र संपला परंतु शालेय मोफत गणवेशाचा पत्ताच नाही.
शिक्षण घेणाऱ्या छोट्या छोट्या मुलांनी मोठी अपेक्षा होती की, शाळेत गेल्यावर नविन गणवेश मिळेल पण नोव्हेंबर महिना उजाडला तरी गणवेशाचा पत्ताच नसल्याने लहान मुले हिरमुसली आहेत. सुरुवातीला गणेश नाही मिळाला तरी पण १५ ऑगस्ट २०२४ ला मिळेल अशी आशा विद्यार्थ्यांसह पालकांना होती. पण यावर्षी शासन येथील पि.एम.श्री.शाळेतिल विद्यार्थ्यांना गणवेश देनार नाही असेच दिसुन येते. त्यामुळे पालकांत रोष असुन शासन शाळा संपल्यावर चिमुकल्यांना गणवेश देईल का असा खोचक प्रश्न पालक विचारत आहेत. येथिल शाळेत इयत्ता दुसरीला २५, इयत्ता तिसरीला २८, चौथीला ३३, पाचवीला १९, सहावीला २०, आणि इयत्ता सातवीला २३ तर पहिलिला ३२ असे ऐकून १४८ येवढी पटसंख्या आहे.
दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश प्राप्त होतात. परंतू सत्र २०२४-२५ मध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रांगी तालुका धानोरा येथिल इयत्ता २ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्र संपले तरी अजून पर्यंत एक ही गणवेश मिळालेला नाही परिणामी विद्यार्थी मागील वर्षिचाच जुना व फाटलेला गणवेश घालून शाळेत येतांना दिसतात. येथील शाळेतील इयत्ता दुसरी ते सातवीच्या मुलामुलींना शालेय गणवेश मिळाले नसल्याचे वरिष्ठांना कळविले आहे.

मुख्याध्यापक अंजुम शेख शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना १५ ऑगस्ट पुर्वीच शासनाने गणवेश उपलब्ध करून दिले असते तर फाटके कपडे लावायची पाळी आलीच नसती.
– ठूमराज कुकडकार
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती रांगी