– परिसरातील शेतकऱ्याची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २३ : तालुक्यातील रांगी परिसर विस्ताराने मोठा असून या परिसराला लागून लहान लहान अनेक गावी आहेत. या भागात सिंचनाची सुविधा नसतानाही धान पिकाची शेती असून या परिसरात हलक्या, मध्यम, आणि जड जातीच्या धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. या भागातील शेतकऱ्यांनी धानाची कापणं बांधन आणि चुरने केले तर काहींनी मळनी यंत्र वापरुन धान शेतीचा हंगाम संपविला घरात येवढे धान्य साठविले शक्य नाही. त्यामुळे शेतकरी आपले धान खाजगी व्यापाऱ्यांना अतिशय कमी दरात विकताना दिसतात. त्यामुळे रांगी येथील धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
रांगी परिसरातील शेतकऱ्यांची दिवाळी तशी अंधारात गेली. कारण धान्याचे उत्पादन होवून खरेदी केंद्र सुरू झाले नाही. याचा फटका बळिराजाला बसला.
धान विक्रीकरिता केंद्र सुरू झाले नाही. दरवर्षी खरेदी केंद्र दिवाळीला सुरू होत होते परंतु यावर्षी हे खरेदी केंद्र सुरू झालेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय कमी भावात आपले धान्य व्यापारांना विकावे लागत आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने खरेदी केंद्रा मार्फत राज्य शासन एकाधिकार योजनेअंतर्गत धान खरेदी करते. आधीच निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांवर टांगती तलवार उभी होती मात्र शेतकऱ्यांनी परिश्रम घेऊन धान्याचे उत्पादन घेतले आणि अवकाळी पावसाने धान करपले, सडले काजळी लागली यामुळे धानाला योग्य भाव मिळत नाही. शासनाचे खरेदी केंद्र सुरू न झाल्याने आपल्या दैनंदिन गरजा आणि सावकाराचे कर्ज परतफेड साठी बळीराजाला आपले धान्य अतिशय अल्प दरात खाजगी व्यापारांना विकावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता धानोरा तालुक्यातील रांगी येथील धन खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
