विद्यार्थ्यांनी स्पष्ट केली तंबाखूमुक्त शाळेची संकल्पना

157

-कोरची तालुकास्तरीय स्पर्धेत कोरची केंद्र शाळा उत्कृष्ट
The गडविश्व
गडचिरोली, २० फेब्रुवारी : दारू व तंबाखूच्या व्यसनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाभरातील शाळांमध्ये प्रश्नमंजुषा व जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्या अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा कोरची गटसाधन केंद्रात पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर करून तंबाखूमुक्त शाळेची संकल्पना स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी वाय.आर. टेंभुर्णे होते. निरीक्षण अधिकारी म्हणून सेवानिवृत्त शिक्षक गोविंदराव हरडे व ऍड. अश्विनी उईके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून बिडीओ राजेश फाये, केंद्रप्रमुख मंदा आवारी ,हिराजी रामटेके, किशोर बावणे आदी उपस्थित होते.
या उपक्रमाअंतर्गत कोरची तालुक्यातील जिप च्या शाळांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात केंद्रस्तरावर निवड झालेल्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पोस्टर, गीत गायन, पथनाट्य सादर करून व्यसनाचे दुष्परिणाम योग्यप्रकारे पटवून दिले. तिसऱ्या टप्प्यातील स्पर्धेत केंद्र शाळा कोरची, जिप शाळा कोचिनारा, कोटरा, मसेली, बेडगांव, कोटगुल व शासकीय आश्रम शाळा कोटगुल या शाळांची निवड करण्यात आली. दरम्यान, आमची शाळा तंबाखुमुक्त शाळा, दारु व तंबाखु विक्री बंदी गाव कस करणार या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. निरीक्षकांनी योग्य मूल्यांकन करून कोरची केंद्र शाळेच्या प्रकल्पाला उत्कृष्ठ ठरविले तर द्वितीय क्रमांक कोचीनारा शाळेने द्वितीय क्रमांक पटकाविला.
कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका संघटक निळा किन्नाके, संचालन के. पी. साखरे तर आभार पी.आर.काटेंगे यांनी मानले. यावेळी शिक्षक एच. आर. बोगा, एम. आर.गायकवाड, एम. एन. मेश्राम, एस. के. दांडवे यांच्यासह विविध शाळेतील शिक्षक उपस्थित होते. जिल्हास्तरावर निवड झालेल्या शाळांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Cheteshwar Pujara) (Kartik Aaryan Shehzada) (Somvati Amavasya 2023) (Goa) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here