– जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्फेतीने मुख्यमंत्री यांना निवेदन
– आजपासून बेमुदत राज्यव्यापी संप
The गडविश्व
गडचिरोली, २० फेब्रुवारी : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांकरिता राज्यभरात बेमुदत राज्यव्यापी संप आज २० फेब्रुवारी पासून पुकारला असून याचे पडसाद गडचिरोली येथेही पहावयास मिळाले आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज २० आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्फेतीने मुख्यमंत्री यांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सतत महागाई वाढत आहे, परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढत्या महागाई नुसार वाढवण्यात आले नाही, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, मासिक पेंशन देण्यात यावी, पोषण ट्रकर मराठीत करण्यात यावा, नविन उच्च दर्जाचा मोबाईल देण्यात यावा, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवनिवृत्तीचा लाभ त्वरीत देण्यात यावा, आजारपणाचा रजा लागू करण्यात यावा हया व इतर मागण्या संदर्भात मुंबई व नागपूर विधानसभेवर व जिल्हा स्तरावर मोर्चा आंदोलन करून सुध्दा फक्त आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाप्रती अत्यंत रोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे कृतीसमितीने २० फेबु्रवारी २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतलेला असून त्याचाच एक भाग म्हणून आज २० फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद गडचिरोली समोर आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या मार्फतिने मुख्यंमंत्री यांना अंगणवाडी कर्मचारी संघटना आयटक राज्य सचिव तथा जिल्हा संघटक देवराव चवळे यांच्या मार्गदर्शनात राधा चवरे, मिनाक्षी झोडे, ज्योती केमलवार, जहारा शेख, अनिता अधिकारी, रूपा पेंदाम, आशा चन्ने, दुर्गा कुर्वे, रेखा जांभुळे, शिल्पा बावनथडे, अल्का कमाळकर, प्रमिला मने, माधूरी रामटेके, मीरा उईके,कांता फटिंग, श्रध्दा गणविर, ज्योजी कोल्हापूरे, वासंती अंबादे यांनी दिले.
ह्या आहेत मागण्या
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुर्वप्राथमिक शिक्षेकेचा दर्जा देवून वेतन श्रेणी लागू करा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासीक पेंशन चा कायदा कारा, शासनाने दिलल्या आश्वासानानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ जाहीर करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नविन उच्च दर्जाचे मोबाईल फोन त्वरीत दया, इंग्रजीत असलेला पोषन ट्रॅकर ॲप मराठीत भाषेत करण्यात यावा, मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडीत रूपांतर करा व मिनी अंगणवाडी सेविकांना नियमित सेविका एवढे मानधन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किरकोळ खर्चासाठी मिळणारी सादीलची रक्कम २ हजार रूपये अपुरी आहे ती वाढवून 5 हजार रूपये करण्यात यावी, कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्ता ३ वर्षापासून थकीत आहे तो त्वरीत देण्यात यावा व यानंतर दर महिण्याच्या मानधनासोबत जोडून देण्यात यावा, शासन निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविका मधून ५० टक्के पर्यवेक्षिकांच्या जागा त्वरीत भरण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वार्षीक १५ दिवासाच्या आजारपणाच्या रजा लागू करण्यात याव्या, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्यूटी लागू करा, सन २०२१ व २२ ची उन्हाळी सुट्टी लॅप्स न करता सन २०२३ च्या उन्हाळी सुट्टी सोबत देण्यात यावी, कारोना काळात कोरोनाचे काम करतेवेळी कोरोनायोध्दा म्हणून मृत्यू झालेल्या आरमोरी ताुलक्यातील ताराबाई गंगाराम दुमाने हिच्या वारसांना शासनाच्या जीआर प्रमाणे ५० लाखांचा विम्याचा लाभ त्वरीत देण्यात यावा, सी.बी.ई च कार्यक्रमाचे थकित रक्कम त्वरीत देण्यात यावे, अंगणवाडी मधील बालकांना देण्यात येणाऱ्या पुरकपोषण आहाराच्या रक्कमेमध्ये वाढत्या महागाईनुसार वाढ करण्यात यावी तसेच अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे दर दुप्पट करण्यात यावी, दुर्गम अतिदुर्गम प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जुन २०१७ पासून चे थकित प्रोत्साहन राशी देणे ५ व १० वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना २०१७ पासून दर महा ३१ व ६३ रूपये मासीक वाढ देण्यात यावी, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा एक रक्कमी लाभ त्वरीत देण्यात यावा.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Cheteshwar Pujara) (Kartik Aaryan Shehzada) (Somvati Amavasya 2023) (Goa) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)