राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक देवेंद्र लांजेवार यांचा सत्कार

159

-The गडविश्व
गडचिरोली, २८ फेब्रुवारी : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने मराठी भाषा दिनाच्या औचित्य साधून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथील शिक्षक देवेंद्र लांजेवार सत्कार प्राचार्य विनीत मत्ते यांचे हस्ते करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीत अग्रणी कार्य करणाऱ्या व शिक्षकांना मार्गदर्शन तथा प्रोत्साहन देणाऱ्या शैक्षणिक संस्थेच्या कार्याच्या प्रेरणेतून कार्य करून देवेंद्र लांजेवार यांनी राज्य पुरस्कार प्राप्त करण्यापर्यंत मजल मारलेली आहे, डायटच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातूनच देवेंद्र लांजेवार यांनी कार्य करून “चालता बोलता शिक्षण, माझा वार माझा उपक्रम, शब्दसंग्रहातून अध्ययन, नवोदय व स्कॉलरशिप मार्गदर्शन” व असे विविध उपक्रम आपल्या शाळेत राबवले असून त्यांचा वापर विद्यार्थ्यांकरिता केलेला आहे. जिल्ह्यातील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करून शिक्षकांना पुन्हा एकदा नवचैतन देण्याचे कार्य शैक्षणिक संस्थेने केलेली आहे.
सत्कार प्रसंगी श्रीमती संध्या येलेकर, पुनीत मातकर, श्रीमती वैशाली येग्लोपवार, विजय रामटेके, प्रदीप पाटील श्रीमती सुचिता काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Devendra Lanjewar) (DIET) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here