बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षकांचा बहिष्कार

196

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २८ फेब्रुवारी : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये शासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे इयत्ता बारावीच्या उत्तर पत्रिका मूल्यांकनावर शिक्षकानी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या बहिष्कारात धानोरा येथील जे.एस.पी.एम महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यासाठी महासंघ व विजुक्टाचे आंदोलन निश्चित करण्यात आलेले आहे. राज्यातील शिक्षण आणि शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाल प्रलंबित ठेवून त्यावर कोणताही निर्णय न घेणे व प्रलंबित ठेवणे, वारंवार शासनाला निवेदन देऊनही सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणे, यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षक आपल्या मागण्यासाठी २२ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर संघटनेने मोर्चा काढला यात आश्वासन देऊनही मान्य करण्यात आले नाही. या मागण्याकडे सातत्याने सरकार डोळे झाक केल्यामुळे नाईलाजस्तव वर्ग बारावीच्या परीक्षेचे उत्तर पत्रिका मूल्यांकनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे विजुक्टा व महासंघ यांनी म्हटले आहे.
मागण्यासाठी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदान तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा, २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे १०,२०,३०, वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करावी, निवळ श्रेणीसाठी २० टक्के ची अट रद्द करावी, वाढीव पदांना रुजू दिनांक पासून मंजुरी द्यावी व आयटी विषय अनुदानित करावा, अघोषित उच्च माध्यमिक अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला प्रचलित अनुदान सूत्र तातडीने लागू करावे, तसेच अनुदानाच्या जाचक अटी रद्द कराव्यात, विनाअनुदानित अनुदानित मध्ये बदलीला १ डिसेंबर २०२२ पासून लागू केलेली स्थगिती त्वरित रद्द करावी, शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंखेचे निकष शाळा साहित्यनुसार असावेत, एम फिल पी एच डी आधार कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना उच्च शिक्षणातील शिक्षकाप्रमाणे वेतन वाढ लागू करावी, निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे, योजना लागू केलेल्या शिक्षकांना हिशोब व ध्येय रक्कम देण्यात यावी, कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्यांना पदोन्नतीची वेतन वाढ देण्यात यावी, अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाल्यावर त्यांच्या अर्धवट सेवेचा कालावधी वेतन वाढ व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावा या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी होत आहे यात प्राध्यापक के.आर. खोब्रागडे, प्रा. टी.बी.धाकडे, प्रा.एन.पी. वटक मॅडम, प्रा. बी.पी. करमनकर, प्रा. वि.आर.रणदिवे, प्रा.व्ही.जे आवारी हे सहभागी होत आहेत.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (Nepal) (Marseille vs PSG) (NEET PG 2023) (Lionel Messi) (Ashwani Gujral)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here