गडचिरोलीत एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

13364

– आत्महत्येचे कारण…
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : येथील जिल्हाधिकारी यांच्या निवस्थानावर कार्यरत एसआरपीएफ च्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवार १२ फेब्रुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. उत्तम श्रीरामे असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
उत्तम श्रीरामे हे गडचिरोली येथील जिल्हाधिकारी यांच्या निवास्थानावर कार्यरत होते अशी माहिती आहे. मात्र आज अचानक त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सदर घटनेने पोलीस विभागासह जिल्हाभरात खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
( the gdv, the gadvishva, gadchiroli, crime news, gadchiroli news, srpf)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here