The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ११ : तालुक्यातील रांगी ते निमगाव रस्त्यावरील पाल नाला वाहतो. या नाल्यावर मागील वर्षी बंधारा बांधण्यात आला. बंधारा तयार करताना अनेक उद्दिष्टे समोर ठेवण्यात आले खरे पण सर्व उद्दिष्टे बाजुला सारत फेब्रुवारी महिन्यात कोरडा पडल्याने हा बंधारा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसून येते.
पाल नाल्यावर निमगाव फाट्याजवळ नव्यानेच बांधलेला हा बंधारा शेतकऱ्यांसाठी लाभदायी असून भर उन्हाळ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना उपयोगी तर आहेत परंतु जनावरांना पिण्यासाठी पाणी सुद्धा या बंधाऱ्याद्वारे उपलब्ध होईल तसेच ग्रामपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा करण्याकरिता याच नाल्यावरती विहीर बांधकाम केलेले आहे. विहिरीतील पाण्याची पातळी टिकून ठेवण्याकरिता जेनेकरुण रांगी गावातील नळ योजना सुरळित राहुन नळाला नियमित पाणी पुरवठा होण्याकरिता बंधारा उपयोगी असल्याचे सांगितले जात होते. पण हाच बंधारा २०२४ च्या फेब्रुवारी महिन्यात कोरडा पडलेला असल्याने हा बंधारा आता कोणाला साथ देणार आणि रांगी येथील नळयोजना भर उन्हाळ्यात चालेल काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पाण्याची पातळी दिवसागणित कमी होताना दिसते. मग शेतकऱ्यांना पाणी कसा आणि कुठून मिळणार, याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यासह रांगीवासीयांना भोगाव लागणार आहे. यापूर्वी सुद्धा याच बंधाऱ्याच्या वरती कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते.