विजाभज आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या १५ दिवसांत निकाली काढा : आमदार सुधाकर अडबाले

163

– समस्या निवारणार्थ सहविचार सभेत दिल्या सुचना
The गडविश्व
गडचिरोली, १८ मे : इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत संचालित अनुदानित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत नागपूर प्रादेशिक उपसंचालक विजय साळवे व विभागातील सहाही जिल्ह्यांचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत पार पडली. या प्रलंबित समस्या १५ दिवसांत निकाली काढाव्या अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्‍या.
आश्रमशाळांचे वेतन १ तारखेला अदा करणे, जिल्हानिहाय संचमान्यताबाबत सध्यस्थिती, चालू सत्रात अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची सध्यस्थिती, शिक्षकांना नवीन तीन लाभाची आश्र्वासित प्रगती योजना लागू करणे, भ. नि. निधि व DCPS कर्मचाऱ्यांच्या हिशोबचिठ्या तयार करणे, मागील पाच वर्षात जेष्ठता डावलून मुख्याध्यापक पदावर दिलेल्या नियमबाह्य पदोन्नत्या रद्द करणे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा तथा रोखीकरण लाभ मंजूर करणे, वस्तीगृह विभाग कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी मंजूर करणे, निवासस्थान उपलब्ध नसणाऱ्या वस्तीगृह अधिक्षकांना घरभाडे व वाहतूक भत्ता मंजूर करून थकबाकी अदा करणे, मयत DCPS कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नवीन सत्राची वेतनवाढ दिल्याबाबत खात्री करूनच माहे जुलै-२३ ची वेतनदेयके मंजूर करणे, विभागातील बंद असलेल्या क्रीडा सांस्कृतिक स्पर्धा पुन्हा सुरू करणे, वरिष्ठ/निवड श्रेणीचे प्रस्ताव, भ. नि. निधिचे परतावा/ना-परतावा अग्रिम प्रस्ताव, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन प्रस्ताव विभागाच्या १६/०२/२०१९ च्या परिपत्रकानुसार ३० ते ४५ दिवसात निकाली काढणे व इतर अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. या प्रलंबित समस्या १५ दिवसांत निकाली काढाव्या व याच विषयांवर जूनच्या पहिल्या आठवड्यात परत बैठक घ्यावी अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी केल्या. यावर प्रादेशिक उपसंचालक यांनी या सर्व समस्या तात्काळ मार्गी लावण्याबाबत होकार दर्शविला.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात अनेक अतिरिक्त शिक्षक विभाग स्तरावर इतर शाळांमध्ये तात्पुरत्या समायोजनाने काम करत आहेत. सन २०१९-२० पासून आश्रमशाळांचे संचनिर्धारण न करता तसेच जिल्ह्यात अनेक अतिरिक्त शिक्षक असतांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांनी अनेक संस्थांना आश्रमशाळांमध्ये नवीन शिक्षकांच्या पदभरत्या करण्याकरिता जाहिरातीस परवानगी दिलेली आहे. यात गैरप्रकार झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्या.
यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, प्रांतीय उपाध्यक्ष श्रीधर खेडिकर, प्रांतीय कोषाध्यक्ष अविनाश बढे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, शहर अध्यक्ष विठ्ठल जूनघरी, भूषण तल्हार, आश्रम शाळा विभागाचे जिल्हाध्यक्ष दिलीप गोखरे, सचिव किशोर नगराळे, अरुण कराळे, मंगेश घवघवे, धनराज राऊत, मंसाराम हेमणे, वानखेडे, मत्ते, कर्णबोधी मांडवे व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva,muktipath serch gadchiroli, gadchiroli news updates) Leicester City vs Liverpool, Sameer Wankhede, Brock Lesnar, Motorola Edge 40)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here