-भामरागड मुक्तिपथ तालुका समितीची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : भामरागड येथील तहसील कार्यालयात मुक्तिपथ तालुकास्तरीय समिती दारू व तंबाखू नियंत्रण जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तहसिलदार किशोर बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी शहरातील सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या पानठेले व किराणा दुकानांची तपासणी करण्यासोबतच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले.
बैठकीला पोलिस निरीक्षक दीपक डोंब, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक ए.एस.गावडे, विस्तार अधिकारी देव्हारे, ग्रामीण रुग्णालयाचे व्ही.ए.फुलझेले, नायब तहसीलदार पी.आर.पुप्पालवार, वैरागडे, तालुका प्रेरक लता भतकु, स्पार्क कार्यकर्ता राजेश मडावी उपस्थित होते.
बैठकीत सर्व शासकीय कार्यालय दारू व तंबाखूमुक्त करणे व सूचनांचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले. पोलिस विभागाद्वारे शहरात व गावपातळीला असलेले मोठे दारू विक्रेत्यांवर कारवाई करून विक्री बंद केली जाईल, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. शहर पातळीवर एक पथक गठीत करून दर महिन्याला सर्व पानठेले व किराणा दुकान यांना सुगंधित तंबाकू विक्री बंद करण्याबाबत सूचना देऊन तपासणी करणे. तालुका व्यसन उपचार केंद्र याबाबत माहिती देण्यात आली व गाव पातळीवर व्यसन उपचार शिबीर घेण्यात येतात व शासकीय कार्यालयातील दारूचे व्यसन असलेल्या व्यक्तींना उपचारासाठी रेफर करावे असे सुचविण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath #bhamragad )