धक्कादायक : जाहिरातीचे होर्डिंग कोसळले, ५ जणांचा मृत्यू

233

The गडविश्व
पुणे, १७ एप्रिल : रोडाजवल असलेल्या जाहिरातीचे मोठे होर्डिंग कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरातील रावेर भागामध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भारती मंचळ (३०) रा. शितलनगर, देहूरोड, शोभा विनय टाक (५०), रा. पारशी चाळ, देहूरोड, अनिता उमेश रॉय (४५) रा. देहूरोड, वर्षा केदारे (४०) रा. शितलनगर देहूरोड, राम प्रल्हाद आत्मज (२०), उत्तर प्रदेश असे मृतकांची नावे आहे तर रहमद मोहमद अंसारी (२१) रा. किवळे, विशाल शिवशंकर यादव (२०) रा. उत्तर प्रदेश, रिंकी दिलीप रॉय (४५) रा. देहूरोड असे जखमींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पुण्यात सायंकाळच्या सुमारास2 वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. वादळी पावसाने रावेत किवळे येथील कात्रज बायपास जवळच्या सर्व्हिस रोडवर एका पंक्चरच्या दुकानाजवळ येणारे जाणारे प्रवाशी थांबले होते. दरम्यान अचानक जाहिरातीचा फलक कोसळला यात आठ जण अडकले होते. स्थानिकांनी तातडीने जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या टीम आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर या लोकांना बाहेर काढले. मात्र यात ५ जणांचा मृत्यू झाला. तर जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here