आरमोरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे शिवजयंती साजरी

207

The गडविश्व
ता. प्र / आरमोरी ( नरेश ढोरे), २० फेब्रुवारी : रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आरमोरी शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे स्थापित असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पाण्याने स्वच्छ करून माल्यार्पण व पुष्पअर्पण करत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय चा जयघोष करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रंजित बनकर तथा शहर अध्यक्षलिलेशदादा सहारे, तेजराव चिलबुले, गणेश तिजारे, जगु लक्षने, उमेश दुमाने, आशुतोष गिरडकर, अशोक सपाटे, सारंग सपाटे, राऊत, धनराज कांबळे, मंगेश करंडे उपस्थित होते.
यावेळी रंजित बनकर यांनी उपस्थिततांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व शहरातील नागरिक उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Cheteshwar Pujara) (Kartik Aaryan Shehzada) (Somvati Amavasya 2023) (Goa) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv) (shivjayanti)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here