खळबळजनक : नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम सभापतीसह सहाजण एसीबीच्या जाळ्यात

1740

– १ लाख ८२ हजारांची स्वीकारली लाच रक्कम
The गडविश्व
गोंदिया, दि. १४ : नाली बांधकाम करण्याच्या १२ लाख १५ हजार ६३४ रकमेवर १५ टक्के प्रमाणे १ लाख ८२ हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी करून नगर पंचायत कार्यालय सडक अर्जुनी येथे व नगराध्यक्षाच्या घरी १३ मे रोजी स्वीकारल्याने सडक अर्जुनी नगर पंचायातच्या नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, बांधकाम सभापती, नगरसेवक व नगरसेविकेचा पती व एक व्यापारी अश्या सहा जणांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांनी रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाईने सडक अर्जुनी मध्ये खळबळ उडाली. सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून पो. स्टे. डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा कंत्राटदार असुन त्यास नगर पंचायत सडक अर्जुनी अंतर्गत वैशिष्ट्य पुर्ण कामासाठी विशेष अनुदान २०२३-२४ लेखाशिर्ष (2217 1301) या योजने अंतर्गत दोन नाली बांधकामाच्या ई निविदा मंजूर झाल्या असून तक्रारदार यांनी सुरक्षा रक्कम भरली आहे. दरम्यान कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता तक्रारदार यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता नगराध्यक्ष यांनी निविदा रकमेच्या १५ टक्के रक्कम लाच मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभग गोंदिया येथे तक्रार दाखल केली असता. तक्रारीच्या अनुषंगाने लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांनी कार्यारंभ आदेश मिळण्याकरीता मुख्याधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी नगराध्यक्ष यांची भेट घेण्यास सांगितले. तक्रारदार यांनी नगराध्यक्ष यांची भेट घेतली असता त्यांनी निविदा रक्कम १२ लाख १५ हजार ६३४ या रकमेवर १५ टक्के टक्के प्रमाणे १ लाख ८२ हजार ००० रुपये लाच रकमेची पंचासमक्ष मागणी केली व मुख्याधिकारी, बांधकाम सभापती यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिले. सापळा कारवाई दरम्यान नगराध्यक्ष याने लाच रक्कम व्यापाराच्या दुकानात देण्यास सांगितल्यावरून व्यापाराने लाच रक्कम स्विकारली. त्यावरून त्यास लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच इतरही पाच जणांना ताब्यात घेऊन पो. स्टे. डुग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे

यांच्यावर गुन्हा दाखल

लाच मागणाऱ्यांमध्ये नगर पंचायत, सडक अर्जुनी चा नगराध्यक्ष
तेजराम किसन मडावी (वय ६६ ), शरद विठ्ठल हलमारे (वय ५६) नायब तहसीलदार, तहसील कार्यालय,सडक अर्जुनी तथा अतिरिक्त पदभार मुख्याधिकारी ,नगर पंचायत,सडक अर्जुनी ( वर्ग२) रा. सेंदुर वाफा,ता.साकोली जि. भंडारा, अश्लेश मनोहर अंबादे (वय ३५), बांधकाम सभापती बांधकाम, न. प. सडक अर्जुनी, महेंद्र जयपाल वंजारी (वय ३४) नगरसेवक न. प. सडक अर्जुनी, नगरसेविकेचा पती जुबेर अलीम शेख राजू शेख रा. प्रभाग क्रं ४,सडक अर्जुनी, खाजगी ईसम
शुभम रामकृष्ण येरणे (वय २७) रा.सडक अर्जुनी जि. गोंदिया. या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई, पोलीस अधीक्षक लाप्रवी नागपूर, राहुल माकणीकर , अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उप अधीक्षक
ला. प्र. वि. गोंदिया विलास काळे, पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, . नि. उमाकांत उगले, स.फौ.चंद्रकांत करपे, पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, मनापोशी संगीता पटले ,चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांनी केली.

(#thegdv #thegadvishva #gondia #acbtrapd #crimenews #mahaacb #acbmaha )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here